आज लोकमत पेपर मध्ये परस्पर दोन विरोधी बातम्या वाचल्या एका पानवर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या पर्यटन क्षेत्रातील उज्वल भविष्य व प्लान
दर्शवला तर दुसऱ्या पानावर पर्यटन कंपनीने लाखो रुपयेची फसवणूक करून पोबारा
केल्याची बातमी.
नाण्याला दोन बाजू असतात पण पर्यटन क्षेत्रला अनेक बाजू असतात. पर्यटनक्षेत्र
हे देशाला सर्वात जास्त परकीय चलन मिळवून देणारे स्तोत्र
(सोअर्स) आहे.परंतु हे मिळविण्यासाठी या व्यवसायातील यंत्रणा व ग्राहकांचा
सुद्धा योग्य प्रकारे सहभाग आवश्यक आहे.
जग डीजीटलायीज होत असून
त्याचा परिणाम सर्व व्यवसायावर होत आहे. किरणामालाच्या दुकानावरून मौल( Mall) संस्कृती
सुरू झाली.त्याचे फ़ायदे-तोटे काळाच्या ओघात सर्वाना लक्षात आले. व्यवसाया मध्ये पैसा मिळविणे
हेच ऐक ध्येय नसून ग्राहकांचे हित सुद्धा जपले पाहिजे. कोणताही व्यवसाय धर्मादाय होऊ शकत नाही. तो उत्तम पद्धतीने दीर्घकाळ चालवायचा असल्यास नफा
मिळविणे अनिवार्य आहे.
आज आपण नाण्यांचा सर्व बाजू लक्षात घेतल्या पाहिजेत.पर्यटन क्षेत्रात
पैशाच्या हव्यासाकरिता गैरमार्ग अवलंबणे आम्हाला मान्य नाही. पर्यटन व्यवसाय हा विश्वास,सचोटीनेच मोठा होतो.यावर आमचा पूर्ण विश्वास
आहे. आणि ही गोष्ट आपण एका रात्री मिळवू
शकत नाही.त्याकरिता कित्येक वर्षे खर्ची पाडावी लागतात. पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या
नवीन कंपन्याना एका रात्री मोठे व्हायचे असते.साहजिकच गैरमार्ग, अवास्तव प्रॉमिस
दिल्या जातात.ज्याचा शेवट फसवणूक या शब्दांवर संपतो.
ग्राहकांनी सुद्धा
फक्त स्वस्त,स्वस्त किंवा डीस्काउंट याचा डंका न
वाजविता प्रत्येक वस्तू किंवा सेवेला काही तरी मिनीमम कॉस्ट व मार्जीन असणे आवश्यक
असते,हे लक्षात घेतले पाहिजे.ग्राहकांनी केवळ स्वस्त/ डीस्काउंटच्या मागे धावलात
तर तुमची फसवणूक १००%.
आज बाजारामध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे.मोठा मासा छोट्या माशाला संपवतोय. व्यवसाया मध्ये कॉम्पपिटीश्न / स्पर्धा जरूर असावी.पण परकिय गुंतवणुकीच्या जोरावर लॉस / तोट्यात मध्ये वस्तू व सेवा देवून कॉमपीटीटरला संपवावे.ही मानसिकता चुकीची आहे.परकीय गुंतवणू की च्या जोरावर लॉस / तोट्यात बीझनेस करून नविन ग्राहक आकर्षित करण्याचा नविन फंडा सुरू झाला आहे.अशा कंपन्या एक दिवशी हजारो लोकांचे पैसे बुडवून पळ काढतात.ग्राहकांनी पर्यटन सेवा घेताना कंपनीची विश्वासार्थ तपासणे जरुरीची आहे.नंतर त्याच्यावर पत्शातापाची पाळी येणार नाही. बाजारात भरपुर सचोटीने व्यवसाय करणाऱ्या कंपनी आहेत आपणास डोळसपणे व्यवहार करणे जरूरी चे आहे.

संतोष खवले संचालक सुरभी ट्रॅव्हल्स ९४२२०३७३४०