सुरभि ट्रॅव्हल्स
"कार टुर्स" तुम्ही
तुमच्या मनाचे राजे!!!
आजच्या या धावपळीच्या युगात
आपल्या मनाप्रमाणे वेळ व्यतीत करणे जणू काही आपण विसरलोच आहोत. प्रत्येक
व्यक्तीस रोजच्या धावपळीचा कंटाळा येतो,
हा कंटाळवाणा दिनक्रम बदलण्यासाठी सज्ज होऊयात चार-पाच दिवस आपल्या घरापासून दूर जाऊन छान मनसोक्त एंजॉय करण्यासाठी.
आता जर तुम्ही एखाद्या चार-पाच दिवसाच्या ग्रुप टूर मध्ये निघालात, तर खाणे-पिणे-फिरणे-रहाणे
हे टूर कंपनीच्या शेड्यूल नुसार करावे लागते, पण हिच टूर जर आपण स्वतंत्र कारने केल्यास आपले शेड्यूल आपण स्वतः ठरवू शकतो.
एखादया ठिकाणी
थांबून धबधबे, व्हॅलीज, मॉन्युमेंटचे मनसोक्त फोटोग्राफ काढायचे असतील तर आपल्या वेळेनुसार तेथे जास्त
वेळ थांबता येते. पाहिजे तेव्हा ब्रेक घेऊ शकता. आणि पाहिजे तेव्हा फिरू शकता.
कारण आपण एंजॉय करण्यासाठी आलेलो असतो त्यामुळे घाईगडबड करून कसे चालेल? प्रवास करताना मध्येच आपल्याला हव्या त्या
ठिकाणी आवडेल त्या रोड साईड रेस्टॉरंट मध्ये लोकल फूड चा आस्वाद घेण्याचे स्वातंत्र्यही
मिळते. स्तलदर्शना बरोबर आपला प्रवासही यादगार होतो हे नक्की.
आपल्याला कारने
देशात तसेच प्रदेशातही प्रवास करता येतो. आपण आपल्या इच्छेनुसार ट्रेन किंवा विमानाने प्रवास करून तिथे कार घेवून अशी टूर करणे आता सोपे
झाले आहे. सर्वात महत्त्वाचे या प्रवासामध्ये Privacy
मिळते, आपल्या बच्चे कंपनी कडे विशेष लक्ष देता येते व त्यांच्याही सर्व इच्छा
पूर्ण होतात, आपल्या कुटुंबा सोबत जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा आनंदही घेता येतो.
शेवटी काय तर
कारच्या टूर मध्ये तुम्ही तुमच्या मनाचे राजे!!!
म्हणूनच असंख्य
ग्राहकांच्या पसंतीला असलेली सुरभि ट्रॅव्हल्स
ही कंपनी घेऊन आली आहे, प्रायव्हेट कारटूर. तुम्ही निवडू शकता शिमला, मनाली, काश्मीर, केरळ,
उदयपुर, जयपुर, बैंगलोर, कुर्ग,आणि अशी अनेक ठिकाणे. ते ही अगदी तुमच्या बजेटमध्ये
!!!